☯️ आज मंगळवारी सायंकाळी ४ वा. देवरूख महाविद्यालयाच्या हाँलमध्ये होणार डीपीआरचे प्रेझेंटेशन
▶️देवरूख- देवरूख नगरपंचायतकडून शहरासाठी २४ तास पाणी पुरवठा करणारी नूतन पाणी पुरवठा योजना तयार करण्यात येणार आहे. याचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यात आला आहे. या डीपीआरचे आज मंगळवारी सायंकाळी ४ वा. देवरूख आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये शहरातील नागरिकांसाठी प्रेझेंटेशन ठेवण्यात आले आहे.
देवरुख शहराची झपाट्याने होत असलेली वाढ आणि नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन देवरूख शहरासाठी २४ तास (२४×७) पाणी पुरवठा करणारी नूतन पाणी पुरवठा योजना तयार करण्यात येणार आहे. सदरची योजना करताना पुढील ३० वर्षाचा देवरुख शहराचा विस्तार व पाण्याची गरज लक्षात घेऊन डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्यात आला आहे. सदर डीपीआरचे प्रेझेंटेशन आज मंगळवारी देवरुख शहरातील नागरिकांसाठी ठेवण्यात आले आहे.
यामध्ये या पाणी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या सूचना देखील लक्षात घेऊन डीपीआरमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. तरी देवरूख शहरातील सर्व नागरिकांनी देवरुख शहरासाठीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या जडणघडणीचे साक्षीदार आणि शिल्पकार बनवण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देवरूख नगरपंंचायतीचे मुख्याधिकारी चेतन विसपुते व नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये यांंनी केले आहे.