▶️ रत्नागिरी ,02 मे- स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना जिल्हा प्रशासनाने जिल्हा बंदीची नोटीस बजावली आहे. काही झाले तरी मी बारसूला जाणारच, असे शेट्टी यांनी जाहीर केले होते. मात्र आता स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना जिल्हा प्रशासनाने जिल्हा बंदीची नोटीस बजावली आहे.
उद्योगपतींची सुपारी घेऊन प्रकल्प राबविला जात असल्याचे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले होते. तसेच बारसु येथील ग्रामस्थांची आपण भेट घेणार असल्याचा निर्धार त्यांनी केला होता. आता त्यांच्यावर जिल्ह्यात येण्यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.