⏩ 30 एप्रिल 2023

रविवारी (दि. ३० एप्रिल) क्रिकेटप्रेमींना डबल हेडर सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. आयपीएल २०२३च्या ४१व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना पंजाब किंग्जशी संपन्न झालं. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला त्यात पंजाबविरुद्ध चेन्नईच्या संघाचा यापूर्वीचा विक्रम चांगला राहिलेला आहे. याचीच पुनरावृत्ती आजच्या सामन्यात करण्यात चेन्नईला अपयश आले अन तब्बल १५ वर्षांनी बालेकिल्ल्यात धोनीच्या चेन्नईचा पराभव झाला. चेपॉकवर दोन्ही किंग्समध्ये पंजाबच सरस ठरली. चेन्नईने पंजाबसमोर २०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पंजाब किंग्सने शेवटच्या चेंडूवर तीन धावा काढत चार विकेट्सने थरारक विजय नोंदवला.