
⏩17 एप्रिल, श्रीवर्धन- रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमध्ये मच्छीमार बोट बुडून खलाशाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. हनुमान गौद्रा (४०) असे मृत झालेल्या खलाशाचे नाव आहे.
मुळ कर्नाटक येथील रहिवासी असलेला व सध्या जीवना बंदर (श्रीवर्धन) येथे स्थायिक झालेला हनुमान गौद्रा हा खलाशा श्रीवर्धन येथील मच्छीमार अतिफ खलिफे यांच्या मच्छीमार बोटीवर काम करीत होता. नेहमीप्रमाणे तो रात्री मच्छीमार बोटीवर झोपला होता. याच वेळी ही बोट बुडाली.झोपेत असल्याने बोट बुडत असल्याचे देखील खलाशाच्या लक्षात आले नाही. पहाटे घटना समजताच ग्रामस्थांनी मदत कार्य केले. पण त्या दुर्घटनेमध्ये हनुमान गौद्रा याचा मृत्यु झाला होता. या दुर्घटनेमध्ये बोटीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन श्रीवर्धन पोलिस ठाण्यात या अपघात आणि मृत्युची नोंद करण्यात आली असून श्रीवर्धन पोलिस अधिक तपास करीत आहेत.