
⏩सेन्सेक्स 674 अंकांनी वधारला
▶️मुंबई-आर्थिक वर्षांच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी दिसून आली. जागतिक बाजारातील चांगल्या संकेतांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. बाजार उघडताच सेन्सेक्स 58500 च्या वर व्यवहार करत आहे. तर, निफ्टीही 17250 चा आकडा पार केला आहे. आज सेन्सेक्स 674 अंकांनी वधारला तर निफ्टी 184 अंकांनी वर गेला आहे. दरम्यान, अमेरीकेतील बाजारात तेजी बघायला मिळाल्यानं भारतीय शेअर बाजारात वृद्धी झाली आहे.
⏩डॉलरच्या तुलनेत रुपया 22 पैशांनी मजबूत
▶️जागतिक बाजारात कच्च्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड 79 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. इराककडून होणाऱ्या पुरवठ्यात घसरणीच्या शक्यतेनं कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. तसेच, डॉलरच्या तुलनेत रुपया 22 पैशांनी मजबूतीसह 82.12 वर उघडला आहे. आज शेअर मार्केटमध्ये अदानी एन्टरप्रायझेज, अदानी पोर्ट, एचडीएफसी बॅंकसारख्या कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत.