
▶️रत्नागिरी दि.13 : 14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 06.00 ते 24.00 वाजता या कालावधीत शासकीय रुग्णालय ते जयस्तंभ या मार्गाने एस.टी. स्टँड रत्नागिरी कडे जाणारी वाहतुक जेल रोड, गोगटे कॉलेज, स्टेट बँक मार्गे जयस्तंभ व तेथून एस.टी.स्टँड या पर्यायी मार्गाने वळविण्याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांनी जारी केले आहेत.
▪️डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बौध्दजन पंचायत समिती रत्नागिरी चे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे हजारो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्याकरीता मोठया प्रमाणात एकत्र जमा होतात. सदर ठिकाणी विविध कार्यक्रम होणार असून मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे होणार असून तेथील रस्त्यावरील वाहतुक दोन्ही बाजुने सुरु ठेवल्यास अपघात घडुन त्याव्दारे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. तरी वरील ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी होवुन कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांना मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 115 नुसार प्राप्त अधिकारान्वये पुढीलप्रमाणे आदेशीत केले आहे.
▪️14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 06.00 ते 24.00 या कालावधीत शासकीय रुग्णालय ते जयस्तंभ या मार्गाने एस.टी. स्टॅण्ड रत्नागिरीकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीकरीता प्रवेश बंद करण्यात येत आहे. तसेच पर्यायी मार्ग म्हणून जेल रोड, गोगटे कॉलेज, स्टेट बँक मार्गे जयस्तंभ व तेथून एस.टी. स्टॅण्ड या पर्यायी मार्गाने वाहतुक वळविणेत यावी, असे आदेशित केले आहे.
▪️तसेच वाहतुक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्ह उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे असे आदेशात नमूद आह