⏩निवृत्त होण्याचा कोणताही विचार नाही, निवृत्तीच्या बातम्यावर नितीन गडकरी संतापले

Spread the love

▶️ नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कायमच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. त्यातच नागपूरमध्ये (Nagpur)रविवारी (दि.26) वनराई फाऊंडेशनच्या वतीने सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलतानाही गडकरींनी परत समाजकारणात जास्त रस असल्याचे सांगितले. कार्यक्रमात नितीन गडकरींनी माझं काम पटलं तर मला मत द्या नाही तर देऊ नका, मी आता मतासाठी फार लोणी लावणार नाही. नसेल तर माझ्याजागी दुसरा कोणीतरी येईल, अशा शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे आता नितीन गडकरींनी एकप्रकारे निवृत्तीचे संकेत दिल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती.

▶️त्यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी पत्रकारांनी त्यांच्या निवृत्तीचे संकेत देणाऱ्या विधानाबाबत विचारले असता त्यावर ते म्हणाले की, मी असं कधीच बोललो नाही. माध्यामांनी विश्वसनीयता वाढवली पाहिजे. कोणी तरी चुकिची बातमी देतं आणि त्यावर इतर माध्यम बातम्या देतात. असं यावेळी गडकरी म्हणाले.

▶️आपल्या त्या विधानावर स्पष्टीकरण देताना गडकरी पुढे म्हणाले की, मी विकासाचे काम केले की लोक आपल्याला आपोआप मत देतात. त्यासाठी मग केवळ निवडणुकी करता मत मागायला जाव लागत नाही. मतांसाठी लोकांना लोणी लावाव लागत नाही. अशा आशयाचं मी बोललो होतो. मी ना राजकारणातून निवृत्त होणार आहे. पण घाई आणि सनसनाटीसाठी चुकिची बातमी देतात. त्यातून गैरसमज होतात असं यावेळी गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे.

▶️या कार्यक्रमात गडकरींना मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार ख्यातनाम वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते देण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमात बोलताना गडकरींनी मतं देण्यावरुन केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

▶️▪️मराठी कलाकारांनी राजकारणात, विरोधी पक्षात असावं का ? अमोल कोल्हेंचा प्रश्न

▶️गडकरी म्हणाले की, आता मलाही या कामात जास्त वेळ द्यायचा आहे, या कामातून भविष्य बदलू शकते. त्यांनी सांगितले की, जलसंवर्धनापासून, वातावरणातील बदलापर्यंत आणि पडीक जमिनींचा योग्य वापर यामध्ये प्रयोगाला भरपूर वाव आहे. त्या क्षेत्रात जिद्दीने काम करतोय. मी प्रेमाने नाही तर ठोकून काम करतो आणि भविष्यातही यातच जोमाने काम करणार आहे. या प्रयोगामुळे भारताची अर्थव्यवस्था नाहीतर ग्रामीण भागात मोठा बदल होण्याची शक्यता असल्याचे यावेळी गडकरींनी म्हटले आहे.

▶️गडकरी म्हणाले की, आपण वेस्ट लँडवर बांबू लागवड केली तर 5 लाख कोटींची अर्थव्यवस्था उभी राहू शकते. त्यातून पर्यावरण रक्षणासोबत रोजगारनिर्मितीही होऊ शकते, असे गडकरी यांनी सांगितले. लोकांना पर्यावरणाचे महत्व कळत नसल्याचे यावेळी ते म्हणाले.

▶️आपले हीतही लोकांना कळत नाही. मुख्य प्रवाहातील लोक पर्यावरण, जलसंवर्धनाचे महत्त्वही समजत नसल्याचे यावेळी गडकरींनी बोलून byदाखवले. मुख्य प्रवाहातील लोकांमध्ये या विषयांना प्राथमिकता मिळाली पाहिजे. वातावरण बदल हा विषय काही लोकांचा असल्याचेही गडकरींनी म्हटले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page