⏩रेल्वे स्थानकावरील आंबा स्टॉल स्थानिक शेतकऱ्यांनाच द्यावेत

Spread the love

⏩रत्नागिरी – आंबा हंगामात कोकण रेल्वे स्थानकांवर हापूस आंबा विक्रीसाठी देण्यात येणारे स्टॉल कोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकरी किंवा त्यांचे अधिकृत विक्रेते यांनाच द्यावेत. त्यासाठी आवश्यक पुरावा घ्यावा, अशी मागणी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्थेतर्फे करण्यात आली आहे.*

कोकणातील हापूस आंबा विक्रीसाठी कोकण रेल्वेकडून वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात. वाहतुकीसाठीही प्राधान्य दिल्यामुळे हापूसचे नाव दूरवर पोहचण्यास मदत झाली. कोकणातील पाच जिल्हातील भौगोलिक परिस्थितीमध्ये तयार होणाराच अस्सल हापूस आहे हे भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर स्पष्ट झाले आहे. कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्था, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था, आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित केळशी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ या चार संस्था हापूस जीआयचे प्रोप्रायटर आहेत.

त्यामुळे हापूसच्या संबंधात प्रसार, प्रचार, शेतकऱ्याला हापूसचे भौगोलिक मानांकन नोंदणी मिळवून देणे ही कामे या संस्था करत आहेत. बाजारात हापूसच्या नावाखाली कोकण सोडून इतर प्रदेशात पिकवलेले आंबेही आता काही व्यापारी, दलाल विकण्याचा प्रयत्न करतात. त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनानेही खबरदारी घेण्याची मागणी संघटनेने केली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page