भाडेकरुंची माहिती ७ दिवसात पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक..

Spread the love

न दिल्यास कलम १८८ प्रमाणे कारवाई…

▪️रत्नागिरी, दि. १८ : घरमालकांनी त्यांच्या घरात भाडेकरू ठेवताना भाडेकरूंचे संपूर्ण नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन फोटो व त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता, घरभाडे करारनामा, ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे प्राप्त करून स्थानिक पोलीस ठाण्याकडे सादर करणे बंधनकारक आहे.

जर ही भाडेकरुंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला न दिल्यास भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील, असा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे..

जिल्ह्याला २३७ कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने आंबा व मासेमारी व्यवसाय केला जातो. रत्नागिरी, चिपळूण व खेड येथे औद्योगिक वसाहती आहेत. आंबा व मासेमारी व्यवसाय करणारे तसेच बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक हे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात इतर जिल्हयातून, इतर राज्यातून, नेपाळ येथून कामगार येतात. तसेच औद्योगिक वसाहती असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरिक नोकरी व्यवसाय इतर कामानिमित्त येवून भाड्याने घरे दुकान गाळे फ्लॅट/फार्म हाऊस घेवून राहतात. परंतु, याबाबतची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात येत नाही.

दहशतवादी कारवाया व गुन्हेगारी पार्श्वभूमीवर एखादा गुन्हा घडल्यावर त्याची तात्काळ उकल होण्यासाठी घरमालकांनी घर भाड्याने देताना भाडेकरूंची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला देणे आवश्यक ठरते. जेणेकरून दहशतवादी व गुन्हेगारी कारवाया आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल.

जिल्ह्यातील नगरपालिका, ग्रामपंचायत इत्यादी हद्दीत राहणारे मालमत्ताधारक यांनी त्यांच्याकडील घरे/दुकान गाळे/फ्लॅट/फार्म हाऊस इ. प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष भाडेतत्वावर देणे, पोट भाडेकरू ठेवणे किंवा विक्री केल्यास विकत घेणाऱ्यांची, भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यास सात दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. जेणेकरून दहशतवादी व गुन्हेगारी कारवाया आटोक्यात आणण्यासाठी त्याची मदत होऊ शकेल..

याकरिता चंद्रकांत सूर्यवंशी, अपर जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये प्रतिबंध आदेश पारीत केला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page