▶️काठमांडू- तब्बल १५० प्रवाशांना घेऊन जात असलेल्या एका विमानाला हवेतच आग लागली; काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना नेपाळ येथील काठमांडू विमानतळावर घडली. या विमानाचे सुरक्षित लँडींग करण्यात आले असून विमानातील सर्व प्रवाशी सुदैवाने बचावले आहे.
काठमांडूवरून दुबईला तब्बल १५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका विमानाच्या इंजिनला विमान हवेतच असताना आग लागली. विमानाला लागलेली आग विमान हवेत असतांना स्पष्ट दिसत असून या घटनेमुळे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. फ्लाय दुबई विमानाला ५७६ असे आग लागलेल्या विमानाचे नाव असून या विमानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. ही घटना लक्षात आल्यावर या विमानाचे दुबईत सुरक्षित लँडींग करण्यात आले.
तब्बल १५० प्रवाशांना घेऊन हे विमान काठमांडू वरून दुबईला निघाले होते. या विमानात १२० नेपाळी तर ४९ परदेशी नागरिक होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाच्या एका इंजिनमधून आगीचे लोळ दिसू लागले. दरम्यान, हे विमान काठमांडू विमानतळावर उतरणार होते. विमानतळावर सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, विमानातील क्रू मेंबरशी संपर्क सुरू होते. या विमानाचे एक इंजिन चांगले असल्याने या विमानाचे सुरक्षित लॅंडींग हे दुबई विमानतळावर करण्यात आले.
नेपाळ नागरी उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार फ्लाय दुबई फ्लाइट ५७६ या विमानाच्या एका इंजिनमध्ये आग लागली होती. या विमानाचे सुरक्षित लँडींग हे दुबई विमानतळावर करण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. मात्र, अधिकारी या घटनेची चौकशी करत आहेत. काठमांडू विमानतळावरून उड्डाण घेत असताना विमानाला आग लागलेली होती.