⏩नवी दिल्ली : पृथ्वीवर मोठी आपत्ती येण्याची शक्यता नासाने वर्तवली आहे. सूर्य त्याच्या 11 वर्षांच्या सौरचक्रातून जात आहे आणि अतिशय सक्रिय टप्प्यात आहे. शास्त्रज्ञांना सूर्यामध्ये एक होल सापडला आहे, जो पृथ्वीपेक्षा 20 पट मोठा आहे. विज्ञानात त्याला ‘कोरोनल होल’ म्हणतात. विशेष म्हणजे एका आठवड्यातच शास्त्रज्ञांना सूर्यामध्ये आणखी एक ‘कोरोनल होल’ दिसला आहे. त्याच्या प्रभावामुळे शुक्रवारी सौर वादळ पृथ्वीच्या दिशेने ताशी २९ लाख किलोमीटर वेगाने येतील.
अहवालानुसार, सौर वादळामळे रेडिओ सिग्नल्समध्ये व्यत्यय येऊ शकतात. यामुळे जीपीएस वापरकर्त्यांना काही समस्या जाणवू शकतात. सौर वादळाचा परिणाम मोबाईल फोनच्या सिग्नलवरही होऊ शकतो, तसेच पॉवर ग्रीडवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, यामुळे ब्लॅकआउट होण्याची शक्यता असते. त्यामुळे या वादळाबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
‘कोरोनल होल’मुळे पृथ्वीला कोणतीही हानी होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे सूर्याचे कमी उष्ण आणि कमी दाट प्रदेश आहेत. जेव्हा सूर्य त्याच्या 11 वर्षांच्या चक्रात कमी सक्रिय असतो तेव्हा कोरोनल छिद्रे दिसतात. उद्या पृथ्वीवर पोहोचणाऱ्या सौर वाऱ्यांचा आपल्या ग्रहावर परिणाम झाला तर कक्षेतील उपग्रहांवर परिणाम होईल आणि पृथ्वीवर तात्पुरता रेडिओ ब्लॅकआउट होऊ शकतो.