
रत्नागिरी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी संभाजीराजे आणि रत्नागिरीच्या अपूर्वा सामंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अपूर्वा सामंत या आमदार किरण सामंत यांच्या कन्या असून त्या उच्चशिक्षित तरुण उद्योजिका म्हणून ओळखल्या जातात. सामाजिक तसेच उद्योजकीय क्षेत्रातील त्यांचा सक्रिय सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला आहे.
त्यांच्या निवडीमुळे कोकणातील युवक-युवतींसाठी क्रिकेट क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील गुणवंत क्रिकेटपटूंना योग्य व्यासपीठ मिळावे, स्थानिक पातळीवर प्रशिक्षण सुविधा, क्रिकेट अकादमी तसेच विविध स्पर्धांचा विकास व्हावा यासाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निवडीमुळे कोकणातील युवाशक्तीला निश्चितच चालना मिळेल तसेच महाराष्ट्र क्रिकेटच्या सर्वांगीण प्रगतीला गती मिळेल, असे मत क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*