Urvashi Rautela : अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच वेगवेगळ्या कारणांची चर्चेत असते. उर्वशी सध्या तिचा आगामी सिनेमा Waltair Veerayaa च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यासाठी ती नुकतीच विशाखापट्टनमला गेली होती. प्रमोशनल इव्हेंटचा तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे की, कशाप्रकारे तिला बघून इव्हेंटमधील लोकांना क्रिकेटर ऋषभ पंत याची आठवण आली. उर्वशी रौतेला जशी स्टेजवर आली तिथे असलेले लोक ऋषभ पंतचं नाव घेऊन ओरडू लागतात. लोक जोरजोरात पंत, पंत ओरडत असल्याने उर्वशी इव्हेंटमध्ये बोलत असताना पुन्हा पुन्हा अडखळत होती आणि लोक सतत ऋषभच्या नावाच्या घोषणा देत होते. तरीही तिला जे बोलायचं होतं ते ती बोलते. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, उर्वशी मेगास्टार चिरंजीवीबाबत बोलत होती.